खुशखबर! रेशन धारकांना या दिवशी मिळणार आनंदाचा शिधा,पहा सविस्तर माहिती Anandacha Shidha

Anandacha Shidha: नमस्कार मित्रानो राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी (11 मार्च) पार पडली आणि त्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त “आनंदाचा शिधा” वितरणाचा निर्णय घेण्यात आला. बैठकेच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

खुशखबर राशन कार्डधारकांसाठी

आता “आनंदाचा शिधा” 1 कोटी 69 लाख शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे. या साठी 550 कोटी 57 लाख रुपये खर्च आणण्यात येईल, ज्यात मंत्रिमंडळ बैठकीत या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. या “आनंदाच्या शिध्यात” 25 लाख अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थी, 1.37 कोटी प्राधिकृत कुटुंब आणि 7.5 लाख शेतकरी आहे.

हे पण वाचा – नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आता येणार या महिन्यात Namo Shetkari 4th Payment

राज्यातील शिधापत्रिका धारकांसाठी, हि आनंदाची बातमी आहे. रेशन कार्ड धारकांना 14 एप्रिल रोजी आनंदाचा शिधा हा देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमिंत, राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांना 4 वस्तू देण्यात येणार आहेत.Anandacha Shidha

आनंदाचा शिधा – शिधापत्रिकाधारकांसाठी खास

आनंदाच्या शिध्यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखऱ आणि 1 लिटर सोयाबीन तेल मिळणार आहे. या सर्व पदार्थांचा संच प्रतिशिधापत्रिका धारकास देण्यात येणार आहे. दिवाळी, दसरा, गुढीपाडव्या सारख्या सणांसाठी राज्यातील गरीब आणि गरजू शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” देण्यात येईल.

हे पण वाचा – एसटी चा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता 1200 रुपये भरा आणि करा पाहिजे तेवढा प्रवास | MSRTC New Scheme

काल मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधिकृत कुटुंब तसंच छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा यांत्रिक जिल्ह्यातील 14 जिल्ह्यांमध्ये रेषेवारील (एपिएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना हा शिधा मिळणार आहे.Anandacha Shidha

आनंदाचा शिधा योजना – गरीबांसाठी एक आशा

महाराष्ट्र सरकारने आनंदाचा शिधा योजना राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना फूड किट देण्यासाठी सुरू केलेली आहे. आनंदाचा शिधा या नावाच्या फूड किटमध्ये प्रत्येकी 1 किलो खाद्यतेल, रवा, चणा डाळ आणि साखर 100 रुपये किमतीत मिळते. ही योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आली होती, आता गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने हा शिधा दिला जात आहे.Anandacha Shidha

मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का तुम्हाला हि माहिती महत्वाची वाटली असेल, तर हि माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला नक्की जॉईन व्हा.

Leave a Comment