Weather Update: नवीन वर्षात हवामान विभागाने वर्तवली पावसाची शक्यता, काय आहे अंदाज?

Weather Update: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या ४८ तासांत दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि नवीन वर्षात राज्याच्या काही भागात हलका पाऊस पडेल. याशिवाय, येत्या 24 तासांत किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होईल, त्यानंतर तापमानावर फारसा परिणाम होणार नसल्याचा अहवाल हवामान खात्याने दिला आहे.

कोकणात गोवा जिल्ह्यात ३ ते ६ जानेवारीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात 5 ते 6 जानेवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. माळसवाडा, विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात आज तापमान 13.8 अंशांवर होते. छत्रपती संभाजीनगर परिसरात 15 अंशांवर तापमान होते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार हे प्रमाण सामान्य तापमानापेक्षा ४ अंशांनी जास्त आहे. जळगावात 14.3 अंश तापमानाची नोंद झाली.Weather Update

येत्या काही दिवसांत तो पूर्व भारतातही पसरू शकतो. IMD ने रविवारी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या काही भागात दाट धुके पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. काही भागात दाट धुके ४ जानेवारीपर्यंत राहील, असे सांगण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment