Maher Ghar Yojana: माहेर घर या योजने अंतर्गत महिलांना मिळणार अनेक लाभ, पहा सविस्तर माहिती

Maher Ghar Yojana: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी विविध प्रकारच्या शासकीय योजना राबविण्यात येत असताना, गरोदर मातांसाठी महत्त्वाची एक योजना सुरू केली आहे, ती ही “माहेरघर योजना” असून, या योजनेच्या माध्यमातून माताची राहण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, खाण्याची व्यवस्था अशा अनेक सुविधा मातेला उपलब्ध करून दिली जातात.

महाराष्ट्रातील बहुतांश आदिवासी लोकसंख्या डोंगराळ प्रदेशात पाड्यामध्ये वास्तव्यास असतात. आदिवासी पाड्यांमध्ये आणि ठिकाणी पक्क्या रस्त्याची सोय नसल्यामुळे गर्भवती महिलांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचण्यासाठी सोय नसते, पर्यायी माता व बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.

आदिवासी भागातील गर्भवती महिलांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, सोयीस्कर वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, अशा विविध आर्थिकदृष्ट्या अशक्य अडचणी लक्षात घेऊन राज्यशासनाकडून सन 2010-11 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत माहेरघर योजना सुरू केली आहे.Maher Ghar Yojana

माहेरघर योजनेच्या माध्यमातून गरोदर मातेला व तिच्या लहान मुलाला निवासाची सोय उपलब्ध करून दिली जाते. या योजनेची विशेषता सुरुवात करण्यात आलेली आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी – इथे क्लिक करा

माहेरघर योजना अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात एक खोली बांधण्यात आलेली आहे. माहेर घरामध्ये गर्भवती महिला प्रसूतीपूर्वी 4-5 दिवस अगोदर भरती करण्यात येतात. गर्भवती महिलांची आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून दैनंदिन तपासणी केली जाते.

माहेर घरामध्ये गर्भवती महिलेसोबत तिचे लहान मुल किंवा एक नातेवाईक यांना राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. राहण्यासोबतच गर्भवती महिला व सोबतच्या नातेवाईकांना भोजनाची सोय आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीमार्फत महिला स्वयंसहाय्यता बचत गट कडून करण्यात येईल. बचत गटाला किंवा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला एका लाभार्थीमागे रु. 500 देण्यात येतील.

राष्ट्रीय आरोग्य कार्यकारी बैठकीत आलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण 16 जिल्ह्यात ही योजना राबविण्यात यावी, परंतु अद्याप या योजनेअंतर्गत 2023-24 या सालपर्यंत राज्यातील नऊ जिल्ह्यातील 57 प्राथमिक आरोग्य केंद्रात माहेरघर बांधण्यात आलेली आहे.Maher Ghar Yojana

मित्रांन्नो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासठी आमच्या whatsapp ग्रुप ला नक्की जॉईन व्हा.

Leave a Comment