Electricity news: अलीकडे महावितरण कंपनीचे जाळे सर्वत्र पसरले आहे; परंतु ते जाळे सर्वत्र चांगले चालत आहे की नाही? याचा तपास अजून लागत नाही, कारण दिवसेंदिवस जसजसे दिवस पलटतील; तसे लोड शेडिंग वाढत चालले आहे आणि लोड शेडिंग वाढल्यामुळे विजेची कमतरता भासत आहे. जास्त करून शेतकऱ्यांना ज्यांचे पूर्ण नियोजन विजेवर आणि पाण्यावर असते त्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे; कारण विविध चालली नाही तर अशावेळी पाण्याचे नियोजन व्यवस्थित करता येत नाही. मोटर पंप सुरू होत नसल्यामुळे पाणी असून पण पीक वाळवून जाते.
Electricity news अशा परिस्थितीमध्ये सरकारने पाऊल उचलावेत म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा आतापर्यंत सातत्याने प्रयत्न केले आहेत आणि सरकारकडे सातत्याने मागण्या सुद्धा केले आहेत. कारण की देशभरामध्ये जास्तीत जास्त नागरिक हे शेतीवरच आधारित आहेत असे म्हटले तरी चालेल. त्यामुळे शेती करत असताना बिना पाण्याची शेती करणे म्हणजे ढगातून सोन्याचा पाऊस पाडल्यासारखे आहे जे कधी शक्य नाही; पाणी आहे तर जीवन आहे आणि झाडांना पाण्याची गरज लागते, त्यामध्ये योग्य उत्पन्न योग्य पिकांचे नियोजन करायचे असेल तर पाण्याची गरज भासतेच (agriculture electricity news). अशावेळी सातत्याने शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीकडे तसेच सरकारकडे व इतर शासकीय अधिकाऱ्यांकडे हीच मागणी केली आहे की आम्हाला दिवसा द्यावी व फुल्ल विज द्यावी.
या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करता सरकारने आता खास शेतकऱ्यांसाठी नवीन नियम काढला आहे कारण की शेतकऱ्यांच्या जीवनाकडे बघता त्यांना नक्कीच कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे; तसेच अलीकडे विविध अस्मानी संकट शेतकऱ्यांना सतावत आहेत; तसेच गुणवत्तापूर्ण शेतमाल तयार करून सुद्धा त्याचा बाजार भाव अगदी कळवडीमोल मिळत आहे (Electricity news update).
अशा विविध समस्यांचा सामना करत असताना शेतकऱ्यांना आता पाण्याची आणि विजेची समस्या सतावत असताना दिसत आहे. पाणी असले तरी वीज नसल्यामुळे शेत कोरडे राहत आहे आणि पिकांना पाणी मिळत नाही. या गोष्टीचा सखोलपणे अभ्यास करून खास शेतकऱ्यांसाठी सरकारने एक नवीन नियम काढला आहे. तर हा नियम नक्की कोणता आहे? याविषयी तपशील माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या सर्व शेतकरी बंधू-भगिनींपर्यंत शेअर करा, जेणेकरून महावितरण कंपनीने जे काही माहिती सांगितली आहे ती सर्वांपर्यंत पोहोचेल. Electricity news
Also Read
जालना जिल्ह्यामधील मुख्यमंत्री यांनी सौर कृषी वाहिनी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामधील जवळपास 70 उपकेंद्रावर 113 मेगा वॅट क्षमतेचे सोलर पॅनल सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प या ठिकाणी उभारले जातील. यामध्ये प्रकल्पांकरिता जिल्हा प्रशासनाने शासकीय जमिनी सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत. अशी माहिती मिळाली या योजनेचा लाभ घेत असताना शेतकऱ्यांनी त्यांचे जमीन भाड्याने द्यावी आणि कोणतेही काम न करता जमिनीचे भाडे मिळवावे असे सुद्धा आवाहन प्रशासनाने केले. या योजनेचा लाभ घेत असताना शेतकऱ्यांनी जमिनी जर भाड्याने दिल्या तर महावितरण कंपनी त्याचा मोबदला देणार आहे. प्रति हेक्टर मागे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाख 25 हजार रुपयांचे भाडे मिळणार आहे. या माध्यमातून शेतकरी चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करू शकतील.
Electricity news जालना जिल्ह्यामधील जवळपास 21 उपकेंद्रांवर सौर ऊर्जेचा प्रकल्प उभारण्याचा या ठिकाणी पहिला टप्पा सुरू झालेला असून, या प्रमुख टप्प्यांमध्ये 170 mwd क्षमतेचे प्रकल्प उभारले जातील. यामध्ये प्रकल्प उभारणीसाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून 908 एकर जमीन या ठिकाणी करारच्या माध्यमातून घेतली आहे आणि उर्वरित उपकेंद्रांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेली आहे. यामध्ये प्रस्तावाला मंजुरी लवकरच मिळेल, अशी दाट शक्यता दिसत आहे. या माध्यमातून विजेची निर्मिती अगदी तातडीने होईल.
अशा परिस्थितीमध्ये जर व्यवस्थित रित्या विजेचा प्रकल्प सुरू झाला तर शेतकऱ्यांना अगदी दिवसा म्हटले तरी विजेचा पुरवठा होईल आणि शेतकऱ्यांना शेतीच्या कामाला चांगल्या प्रकारे चालना मिळेल. अशावेळी शेतकऱ्यांना याचा आर्थिक हातभार लागेल. यासोबतच सौर ऊर्जेचा वापर करत असताना पर्यावरणास चांगली रक्षण होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाभ यामुळे होणार असून, लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने तातडीने प्रयत्न सुरू केले आहे.
या योजनेचे फायदे (Electricity news)
- शेतकऱ्यांना नक्की कोणकोणते फायदे होतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
- तर शेतकऱ्यांना अगदी दिवसा विजेचा पुरवठा होणार आहे.
- यासोबतच शेतकऱ्यांना शेतीचे काम करत असताना चालना मिळणार आहे.
- शेतकऱ्यांना आर्थिक लाभ सुद्धा या माध्यमातून होणार आहे.
- सौर ऊर्जेचा वापर वाढवून या ठिकाणी पर्यावरणास रक्षण करण्यास चांगली मदत होणार आहे.