Dairy Farming Scheme: अरे व्वा! दुग्ध व्यवसायिकांसाठी नाबार्डने राबवली भन्नाट योजना; आता मिळेल बंपर सबसिडी

Dairy Farming Scheme: शेतकरी मित्रांनो नमस्कार, आज आपण पाहणार आहोत खास शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या नाबार्डच्या एका योजनेविषयी संपूर्ण माहिती. आजच्या लेखामध्ये आपण नाबार्ड योजनेचे मुख्य उद्दिष्ट, नाबार्ड योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान, लाभार्थ्यांची पात्रता, तसेच कोणकोणत्या संस्थे अंतर्गत कर्ज मिळते (Dairy Farming Scheme Online Apply), यासोबतच योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे अटी नियम काय असतील तसेच या माध्यमातून आणखी कोणत्या योजना राबवली आहेत अशी विविध माहिती जाणून घेऊया

नाबार्ड डेअरी लोन योजनेचे मुख्य उद्दिष्ट –

शेतकरी तसेच उद्योजकांना अवधी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे हेच नाबार्डच्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अशाप्रकारे हा व्यवसाय ते अगदी व्यवस्थित रित्या चालू शकतील. यासोबतच दूध उत्पादनास चांगली चालना देणे शक्य होईल (nabard scheme for dairy farming). ज्यामुळे आपल्या देशभरातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल आणि रोजगार वाढेल. म्हणजे जास्तीत जास्त रोजगार च्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रशासनाने ही योजना राबविण्यावर भर दिला आहे.

नाबार्ड डेअरी योजना अनुदान आणि लाभ –

1) नाबार्ड डेअरी लोन योजनेअंतर्गत विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यामध्ये तुम्ही दूध प्रक्रिया युनिट सुरू करू शकता.

2) जर तुम्ही नाबार्ड डेअरी योजनेअंतर्गत 13 लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल तर यामध्ये तुम्हाला 25% अनुदान मिळत आहे. म्हणजे तीन लाख तीस हजार रुपये सरकार तुम्हाला देत आहे (nabard scheme for farming sector) आणि अशावेळी जर तुम्ही एससी एसटी प्रवर्गातील असाल तर चार लाख चाळीस हजार रुपये तुम्हाला सरकार देत आहे.

3) जर तुम्हाला दुग्ध व्यवसाय करायचा असेल अशावेळी तुम्ही पाच किंवा पाचपेक्षा कमी काही गाईपासून व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल तर, या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गाईवर 50% अनुदान सरकार देत आहे. वरील 50 टक्क्यांचे रक्कम शेतकरी मित्रांना स्वतः भरावी लागेल.

Dairy Farming Scheme: नाबार्ड डेअरी योजनेसाठी पात्रता

शेतकरी, असंघटित क्षेत्र, उद्योजक, बिगर सरकारी संस्था, संघटित गट, कंपन्या हे सर्व घटक नाबार्डच्या योजनेसाठी पात्र असतील.

 1. राज्य सहकारी कृषी बँक
 2. ग्रामीण विकास बँक
 3. राज्य सहकारी बँक
 4. प्रादेशिक बँक
 5. व्यावसायिक बँक
 6. अन्य संस्था

नाबार्ड डेअरी अनुदान योजनेच्या अटी कोणत्या?

 • या योजनेच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीस काही विशिष्ट घटकांसाठी अर्ज करायचा असेल तर नक्कीच दुग्ध व्यवसाय संबंधित बाबींसाठी तो अनुदान मिळू शकतो (nabard subsidy). पण ती व्यक्ती त्या योजनेसाठी पात्र ठरू शकते.
 • नाबार्डने राबवलेली योजना आहे त्या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकच व्यक्ती अगदी व्यवस्थितपणे लाभ घेऊ शकते. परंतु तसे बघितले तर दोन वेळा आपण लाभ घेता येतो. त्यासाठी दोन प्रकल्प आहेत त्यामधील अंतर मीटर पेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे.

नाबार्ड डेअरी लोन योजनेसाठी ऑफलाइन प्रक्रिया –

 • सर्वप्रथम तुम्हाला संबंधित जिल्ह्यामधील नाबार्ड कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
 • अर्ज करणाऱ्या व्यक्तीने मोठी कर्जाची रक्कम घ्यायचा निश्चय केला असेल तर अशावेळी जो काही डेअरी प्रकल्पाचा अहवाल असेल तर सादर करावा
 • जर एखाद्या व्यक्तीस छोटीशी डेरी फार्म सुरू करायचे असेल, तर ती व्यक्ती अशावेळी संबंधित कोणत्याही बँकेची माहिती घेऊन कर्ज उपलब्ध करून घेऊ शकते. त्यासाठी अर्ज करावा लागेल.
 • योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेमध्ये जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी सबसिडी फॉर्म भरावयाचा आहे.

नाबार्ड डेअरी योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया –

Dairy Farming Scheme: बँकेमध्ये न जाता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर तुम्ही अगदी बिनधास्तपणे अर्ज सादर करू शकता. यासाठी आपल्याजवळ कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन अर्ज सादर करा. सोबत आवश्यक कागदपत्रे घेऊन जावा (nabard yojana 2023). तसेच पुढील दिलेल्या नाबार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन सुद्धा तुम्ही स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्ज करत असताना जी काही विचारलेली माहिती आहे ती व्यवस्थित रित्या भरावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावेत.

3 thoughts on “Dairy Farming Scheme: अरे व्वा! दुग्ध व्यवसायिकांसाठी नाबार्डने राबवली भन्नाट योजना; आता मिळेल बंपर सबसिडी”

Leave a Comment