Crop Insurance Date : पिकविम्याची तारीख फिक्स,पहा कधी मिळणार

Crop Insurance Date: शेतकरी मित्रांनो नमस्कार, उमापूर महसूल मंडळातील 1563 शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2016 साठी तब्बल 49,22,185 रुपयांचा पिक विम्याचा हप्ता हा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या उमरुंशाखेत जमा केला होता.

या बँकेतील बँक कर्मच्याऱ्यांनी महसूल मंडळाची चुकीची नोंदणी केली असल्यामुळे त्यावेळी हे सर्व शेतकरी बांधव पिक विम्याच्या लाभा पासून वंचित राहिले, केवळ बँक कर्मच्याऱ्यांनी केलेल्या या चुकीमुळे 1563 नुकसानग्र्हस्त शेतकरी बांधवांना पिक नुकसान भरपाई ची रक्कम हि मिळाली नाही.

शेतकरी बांधवांना हा प्रश्न त्यावेळी श्री अमरसिह पंडित साहेब यांनी विधान परिषदेत उचलून धरले होते सभागृहातील आश्वासनानुसार विमा कापणी, बँक आणि शासन प्रतिनिधी यांसमवेत बैठक हि पूर्ण झाली.

(Crop Insurance Date) सन 2018 रोजी शेतकरी बांधवांच्या वतीने मा. उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहितार्थ याचिका हि जाहीर केली होती या याचिकेत दिनांक 24 जानेवारी 2019 रोजी न्यायालयाने 7 टक्के व्याजदराने शेतकरी बंधावंना नुकसान भरपाई हि देण्यात यावी असा हा निर्णय घेण्यात आला.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वाटणे मा. उच्च न्यायालय यांच्या आदेशां वरून सर्वोच्च न्यायालयात आव्हानित करण्यात आले. माजी आमदार श्री अमरसिह पंडित साहेब यांनी मा. सर्वोच उच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह हि अपील केली.

मा. सर्वोच्च न्यायालयात सन 2019 पासून आजवर विविध सुनावण्या ह्या आजवर झाल्या. मा. सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी बांधवांच्या बाजूने आदेश हा पारित केला आता उमापूर, मालेगाव, जळगाव,शेकटा,बोरगाव,बोरीपिंपळगाव आणि इतर गावांतील तब्बल 1563 शेतकऱ्यांना सुमारे 5 कोटीहून अधिक रक्कम हि पिक विमा नुकसान भरपाई हि देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.Crop Insurance Date

Leave a Comment