Electric Motor Pump: शेतीला तसेच शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी प्रशासन तत्परतेने कल्याणकारी योजना राबवण्यावर भर देत आहे. या अनुषंगाने योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक दृष्ट्या फायदा झालाय. कृषी क्षेत्रामध्ये विकसित अशा तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना पुरेपूर फायदा होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांची होणारी जी धावपळ आहे ती खूपच कमी होत आहे. तसेच कमी वेळेमध्ये जास्तीचे काम शेतकरी करू शकत आहेत.
तसेच कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल यावर शेतकरी भर देत आहेत. (Electric Motor Pump Subsidy online apply). यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा मजूर खर्च सुद्धा कमी करण्यास मोठी मदत झाली आहे. म्हणजे सध्या बदलत्या काळाच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर शेतीमध्ये सुद्धा विकसित तंत्रज्ञान चांगलेच वाढत चालले आहे आणि ही नक्कीच महत्त्वाची बाब आहे.
राज्य शासनाने राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक खास योजना राबवली आहे. त्या योजनेचे नाव आहे इलेक्ट्रिक मोटर पंप सबसिडी. म्हणजे इलेक्ट्रिक मोटर पंप खरेदीवर आता स्वतः सरकार अनुदान देत आहे. म्हणजे शेतकऱ्यांचा या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटर पंप खरेदी करण्याचा खर्च वाचणार आहे (Electric Motor Pump Subsidy). शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे उत्पादन कशा प्रकारे वाढवता येईल या गोष्टीचा सरकार चांगल्या तरीने विचार करत आहे. या दृष्टिकोनातून सरकारने आता विद्युत मोटर पंप खरेदी करण्यावर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा: Dairy Farming Scheme: अरे व्वा! दुग्ध व्यवसायिकांसाठी नाबार्डने राबवली भन्नाट योजना; आता मिळेल बंपर सबसिडी
Also Read
तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा व कोठे करावा. यासोबतच कोणकोणती आवश्यक कागदपत्रे अर्ज करत असताना लागतील. तसेच या विद्युत पंप सबसिडीचा लाभ सर्वच शेतकऱ्यांना मिळणार आहे का? कोणकोणते शेतकरी या योजनेस पात्र असतील. तसेच सबसिडी अंतर्गत किती टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशी विविध तपशीलवार माहिती आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत (government subsidy for electric motor pump in maharashtra). कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या सर्व शेतकरी बंधू-भगिनींपर्यंत शेअर करा. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचेल आणि जास्तीत जास्त लाभार्थी महाराष्ट्र राज्यात होतील.
योजनेअंतर्गत मिळेल इतकी सबसिडी –
शेतकऱ्यांसाठी सरकारने शेवटी आणखी एक आनंदाची बातमी आणलीच. कारण की राज्यभरातील काही पात्र शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये विद्युत मोटर पंप बसवण्यासाठी तब्बल 75 टक्के अनुदान देणार असून, शेतकऱ्यांना फक्त 25 टक्के रक्कम स्वतःच्या खिशातून खर्च करावी लागणार आहे (Electric Motor Pump subsidy in maharashtra). उर्वरित जी काही रक्कम असेल ते प्रशासन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे. चला तर अर्ज प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे बघूया.
पात्रता निकष –
योजनेच्या माध्यमातून विद्युत पंप (Electric Motor Pump) खरेदी करायचा असेल तर तुम्हाला सरकार जास्तीत जास्त 75 टक्के अनुदान देत आहे किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये लाभार्थी व्यक्तीस देत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्की अर्ज कोण करू शकेल. तर जे शासकीय कर्मचारी असतील त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच या आधी पोखरा योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही लाभ घेतला असेल तर असे होईल या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तरी इतर शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतील.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. आता अर्ज सादर करत असताना काही महत्त्वाची कागदपत्रे आपल्याला सादर करावी लागतील. हे माहीतच आहे. तर आवश्यक कागदपत्रांमध्ये सर्वात प्रथम जो शेतकरी विद्युत मोटर पंप (Electric Motor Pump Scheme) योजनेतून खरेदी करणार आहे. त्यासाठी अर्ज करत आहे. त्या शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी अर्धा एकर जमीन असावी आणि त्या शेतकऱ्यांनी त्या शेताचा सातबारा व आठ अ खाते उतारा सादर करायचा आहे, तसेच त्या शेतकऱ्याच्या आधार कार्ड, बँक पासबुक व पासपोर्ट आकाराचे फोटो, तसेच मतदान ओळखपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे गरजेचे आहे. ती कागदपत्रे मागितल्यानंतर सादर करावी लागतील.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया – Electric Motor Pump Subsidy online apply
इलेक्ट्रिक मोटर पंप सबसिडी या योजनेचा लाभ घेत असताना सर्वात प्रथम आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. तर सरकारच्या पुढील अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करून तुम्ही अगदी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे. यासाठी तुम्हाला पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल. त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर पोहोचाल. त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वात प्रथम या योजने संबंधित संपूर्ण तपशील माहिती जाणून घ्यायची आहे आणि मगच अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करत असताना त्या ठिकाणी ची माहिती विचारलेली आहे ती कोणतीही चुकून न करता माहिती भरायची आहे. जर चूक केल्यास तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यासाठी व्यवस्थित रित्या अर्ज भरायचा आहे माहिती भरायचे आहे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत अपलोड करायचे आहेत.
अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या अर्जांची पडताळणी होते आणि व्यवस्थितरित्या अर्ज चेक केले जातात. या माध्यमातून लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाते आणि जे कोणी लाभार्थी असतील त्यांना योजनेअंतर्गत विद्युत मोटर पंप (Electric Motor Pump Subsidy) खरेदीवर अनुदान दिले जाते.