RTE 25 Admission Rules 2024-25 In Marathi : RTE द्वारे प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला नवीन नियम माहित असणे आवश्यक आहे. RTE प्रवेश 2024-25 साठी नवीन नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत. मग या अटी आणि नियम काय आहेत? RTE साठी ऑनलाइन अर्ज करताना लक्षात घेण्यासारख्या गोष्टी. आता, नवीन नियमांनुसार, कोणत्या शाळेत मुलांना प्रवेश दिला जाईल यावर अवलंबून आहे. याशी संबंधित सर्व नियम खाली दिले आहेत. चला तर मग जाणून घेऊया RTE च्या सर्व अटी आणि नियम.
शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी आरटीई अंतर्गत 25% राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रियेसाठी गरीब आणि दुर्बल आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलांना पुढील सूचना देण्यात आल्या आहेत. खालील सूचनांचे पालन करून पालक त्यांच्या मुलांसाठी 2024-25 साठी अर्ज करू शकतात.
📢 पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना
खालील कारणांमुळे शाळा RTE 25% मध्ये प्रवेश नाकारू शकतात. पालकांनी ही माहिती जाणून घेतली पाहिजे आणि ती RTE पोर्टलवरही उपलब्ध आहे.
📢 RTE Admission नियम व अटी
- विद्यार्थ्यांना निवास स्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यीत शाळा सर्व प्रकारच्या शाळा असतील. वंचित व दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना 25 टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वयंअर्थसहाय्यीत शाळा असा प्रवेशासाठी चा प्राधान्यक्रम असणार आहे. तथापि एखाद्या पालकांनी प्रथम प्राधान्य म्हणून अनुदानित शाळा ऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्रथम प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा निवडता येईल.
- विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा किंवा शासकीय शाळा नसतील व स्वयंअर्थसहाय्यीत शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थसहाय्यीत शाळेत मुलांना 25 टक्के अंतर्गत सोडत पद्धतीने प्रवेश दिला जाईल.
- अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यीत शाळा नसेल तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटर पर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्याने होतील.
- ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई 25 टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सादर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
- प्रवेश अर्ज भरतांना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरू नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सादर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी.
- भाडेतत्त्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा.
- भाडे करार हा अर्ज भरण्याच्या दिनांकाचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा. जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडेकरार दिला असेल त्या ठिकाणी बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्यापलकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर बालकांचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच प्रवेश आरटीई मधून झाला तरी ही संबंधित पालकांना संपूर्ण फी भरावी लागेल.
1 thought on “RTE प्रवेश नवीन नियम व अटी 2024-25 जाणून घ्या | RTE 25 Admission Rules 2024-25 In Marathi”