Maharashtra Farmer Tractor Loan : आपला भारत देश हा शेतीप्रधान देश असून आपल्या भारत देशामध्ये जास्तीत जास्त जनसंख्या ही प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राला चांगली उभारी देण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरिता विविध अशा कल्याणकारी योजना या नियमितपणे राबवल्या जात आहेत आणि त्या योजनांकडे आपण सुद्धा लक्ष दिले पाहिजे कारण की सरकार योजना राबवत आहे. परंतु त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि या कारणामुळे नागरिक शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात.
असे होऊ नये त्यासाठी आम्ही विविध अशा सरकारच्या कल्याणकारी योजना ज्या शेतकऱ्यांसाठी व सर्व नागरिकांसाठी उपयोगी ठरणार आहे. त्या योजना विषयी माहिती घेऊन येत असतो तरी आम्ही शेअर केलेले सर्व लेख व्यवस्थितरित्या वाचून घ्यावेत आणि ज्या काही योजना आहे त्याची माहिती घेऊन योजनांचा लाभ घ्यावा (Tractor Loan scheme 2023 apply online). तर आज सरकारने खास शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या एका महत्त्वाच्या योजनेबद्दल आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत तरी कृपया हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या सर्व शेतकरी बंधू-भगिनी पर्यंत शेअर करा.
राज्यभरातील जास्तीत जास्त जनसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांचे उत्पन्नाचे स्त्रोत ही शेतीच आहे. शेतकऱ्यांचे प्रमुख उदरनिर्वाहाचे साधन शेती असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगली उभारी देण्यासाठी मागील कित्येक वर्षापासून प्रशासन तत्परतेने प्रयत्न करत आहे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून यांत्रिकीकरणाला सुद्धा तितकीच चालना दिली जात आहे (Tractor Loan subsidy). या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकरी यंत्राचा वापर शेतामध्ये करू शकतील आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतामध्ये करू शकतील. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल कमी वेळेत जास्त काम होईल. शेतकऱ्यांचे कष्ट कमी होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास चांगली मदत होईल.
सरकारने राबवली ही महत्त्वाकांक्षी योजना
सरकारने राबवली ही महत्त्वाकांक्षी योजना. ट्रॅक्टर सारख्या विविध यंत्राच्या खरेदीवर प्रशासनाच्या माध्यमातून अनुदान या ठिकाणी पुरवले जात आहे. याशिवाय बघितले तर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्गाला ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवले जात आहे. अलीकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ याविषयी तुम्ही कुठेतरी वाचले असेलच हो तर या माध्यमातूनच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे (Agriculture tractor loan subsidy in india). या कर्जाचा लाभ घेऊन शेतकरी स्वतःचा हक्काचा ट्रॅक्टर घेऊ शकतील आणि आपल्या शेतीची मशागत करू शकतील. तसेच शेतकरी इतरांच्या शेतीची मशागत करून जास्तीचे पैसे कमवू शकतील.
म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचे उत्पनाचे साधन या ठिकाणी तयार होणार आहे, कारण गावामध्ये सर्व शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नसतात. अशावेळी बाकीचे शेतकरी इतरांच्या ट्रॅक्टर भाड्याने सांगून शेतीची मशागत अगदी व्यवस्थित रित्या करून घेतात (Tractor loan interest rate). अशा वेळी, जर या माध्यमातून कर्ज सुविधेच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी केला तर नक्कीच शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीसोबत इतरांच्या शेतीची मशागत करून अधिक ची कमाई करता येणार आहे.
तसे बघितले तर मागील कित्येक महिन्यांपासून या योजनेच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी जे काही कर्ज दिले जात होते त्याचे वितरण बंद करण्यात आले होते; परंतु आता पुन्हा एकदा नव्याने या योजनेचा आरंभ झाला असून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज वितरण प्रणाली सुरू झाली आहे. महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र पाटील यांनी सुद्धा याबाबत महत्त्वाची माहिती दिली की आता नागरिक ट्रॅक्टर खरेदीसाठी या योजनेतून सुद्धा कर्ज घेऊ शकतील आणि आपला स्वतःचा ट्रॅक्टर घेऊ शकतील.
Also Read
तसे पाहता प्रशासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टर अनुदान योजना (Farmer Tractor Loan) सुद्धा चांगल्या तऱ्हेने राबवली जात आहे शिवाय मराठा समाजामधील बांधवांकरिता या योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा सुद्धा केला जात आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळा अंतर्गत ज्या काही राबविण्यात आलेल्या योजना आहेत त्या योजनाच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीस जे काही कर्जाचे व्याजदर असेल त्यावर 70 ते 80% परतावा मिळत आहे, म्हणजे 70 ते 80 टक्के व्याज इतरावर सूट सुद्धा मिळत आहेत.
या योजनेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला 15 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जात आहे. यावर कर्जावरील एकूण व्याजदरा पैकी 70 ते 80 टक्के व्याजदराचा परतावा हा स्वतः महामंडळ करत आहे; निश्चितपणे यामुळे सर्व प्रवर्गातील नागरिकांसोबतच मराठा समाजातील नागरिकांना सुद्धा आर्थिक दृष्ट्या चांगला लाभ मिळणार आहे. तसेच, मागास प्रवर्ग आणि इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना सुद्धा ट्रॅक्टर खरेदी करणे अगदी सोयीचे होणार आहे.
यामुळे अलीकडे राज्यात सुद्धा कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाला चांगली चालना मिळेल आणि ट्रॅक्टरचा वापर चांगल्या प्रकारे वाढवून योग्य; ती मशागत करून शेतकऱ्यांचे उत्पादन सुध्दा वाढेल. उत्पादनात भर झाली की नक्कीच शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण बघितले तर या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज नक्कीच भासू शकणार आहे. याविषयी आपण बघूया.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
1) आधार कार्ड,
2) पॅन कार्ड,
3) रेशन कार्ड,
4) शाळा सोडल्याचा दाखला / जातीचे प्रमाण पत्र,
5) ३ वर्षे उत्पनाचा तहसीलचा दाखला,
6) आधारला लिंक असलेले मोबाइल नंबर,
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जायचे आहे. अधिकृत संकेतस्थळावर केल्यानंतर या योजनेविषयी कर्ज सुविधा विषयी सविस्तर अशी तपशील माहिती जाणून घ्यायची आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जर तुम्हाला अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येत नसेल तर अशावेळी आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन अर्ज सादर करू शकता; अर्ज सादर करत असताना जी काही वरील आवश्यक कागदपत्रे आहेत ती सोबत ठेवावीत आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
अर्ज सादर केल्यानंतर योजनेचे अधिकारी असतील ते तुमच्या अर्जाचे पडताळणी करतील आणि तुम्ही योजनेस पात्र ठरत असाल तर तुम्हाला तसे कळवले जाईल आणि कर्ज सुविधाचा लाभ मिळवून दिला जाईल. यामध्ये मात्र तुम्ही कर्ज सुविधेचा लाभ घेऊन नवीन ट्रॅक्टर खरेदी करू शकता आणि आपल्या उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत तयार करू शकता. या सोबतच आर्थिक दृष्ट्या सक्षम बनू शकता.
Ho pahije aamala ryaktr