Kanda Chal Anudan : मित्रांनो तुम्ही शेती करत असाल तर नक्कीच तुम्हाला आतापर्यंत अनेक अनुभव आले असतील. त्यामध्ये जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर कांद्याच्या बाजारपेठेबद्दल तर तुम्हाला चांगलाच धडा शिकायला भेटला असेल आणि चांगलीच माहिती तुम्हाला याबाबत भेटली असेल, कित्येकदा आपण बघितले आहे की कांद्याचे दर अगदी वर्षानुवर्षे कमीच असतात आणि ते दर सलगपणे तसेच कमी राहतात. अशावेळी अचानकच कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याची बातमी आपल्याला कळते आणि आपण डोक्याला हात लावतो, अरे बापरे! आता आपला कांदा कुठे आहे तेव्हा आता जर कांदा असता तर मार्केटमध्ये घालून मोठी कमाई केली असती आणि निवांत बसलो असतो.
परंतु आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याच्या बाजार भावाबाबत जास्त विचार न करता; त्यांनी एक वेगळी यंत्रणा राबवली पाहिजे. ती म्हणजे त्यांनी त्यांच्या कांद्याची साठवणूक करण्यासाठी कांदा चाळ बांधली पाहिजे. या माध्यमातून निवांत आपल्याला पाच ते सहा महिन्यापर्यंत कांदा साठवता येतो आणि ज्यावेळी मार्केटमध्ये कांद्याला चांगला बाजारभाव येईल आणि त्यावेळी त्या कांद्याची विक्री करता येईल (Kanda Chal Anudan online application). या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. सरकार सुद्धा आता कांदा चाळ बांधणीसाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देत आहे; या माध्यमातून आता शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा वाचतील आणि कांदा चाळ च्या माध्यमातून आपल्या कांद्याला योग्य दर मिळवण्यास चांगला उपयोग होईल.
Onion Warehouse Subsidy : खास कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने कांदा चाळ अनुदान योजना राबवली आहे; कांदा चाळ बांधण्यासाठी अनुदान देण्याकरिता राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी बघितले तर तब्बल 51 कोटी रुपयांचा निधी शासनाकडून अगदी मंजूरच झाला आहे.
Also Read
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ बांधणीसाठी अनुदान मिळवून देण्याकरिता कृषी विकास योजनेच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी 51 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासनाने आता मंजुरी दिली आहे या रकमेच्या माध्यमातून बघितली तर 20 जिल्ह्यांमध्ये 5700 कांदा चाळ उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून (Kanda Chal Subsidy maharashtra) यंदाच्या वर्षी उत्पादनामध्ये अग्रेसर असे जिल्हे बघितले तर छत्रपती संभाजी नगर नाशिक नगर जालना पुणे या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यभरामध्ये प्रत्येक वर्षी बघितले तर सर्वसाधारणपणे अधिक क्षेत्रावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते; खरीप सोबतच लेट खरीप तसेच रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये कांदा लागवडीवर शेतकरी चांगलाच भर देतात. मागील वर्षी पाण्याची उपलब्धता अगदी चांगली होती, त्यामुळे कांदा उत्पादन चांगलेच वाढले होते.
कांदा चाळ योजनेअंतर्गत शासन देत आहे इतके अनुदान:
अशावेळी प्रत्येक वर्षीपेक्षा जवळपास 20% जास्त क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली कांदा उत्पादनानंतर त्याची व्यवस्थितरित्या साठवणूक करण्यासाठी कित्येक शेतकऱ्यांकडे कांदा चाळ नाही. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून 25 क्षमतेची कांदा चाळ बांधण्यासाठी शासन 87 हजार रुपये इतके अनुदान देत आहे.
कांदा चाळ बांधणीसाठी विविध मटेरियल चा समावेश अनुदानामध्ये केला आहे. त्यामध्ये सिमेंट, लोखंड, जाळी, इत्यादी बाबी आहेत. दिल दीड वर्षांपासून लोखंडासोबतच सर्वच साहित्यांचे दर अगदी दुपटीने म्हटले तरी चालेल इतके वाढले आहेत, त्यामुळे आता सर्वसाधारणपणे पाच टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी जवळपास तीन लाखांच्या कर्ज या ठिकाणी येत आहे. प्रशासन मात्र अशावेळी अगदी दहा वर्षांपूर्वीच जो काही दर निश्चित केला होता, तो गृहीत धरून अनुदान देत होते.
अनुदानाच्या वाढीबाबत अशावेळी चर्चा सातत्याने सुरू होती आणि दीड वर्षापूर्वी या ठिकाणी कृषी संचालक रवींद्र माने तसेच राज्यभरातील काही अभ्यासू अधिकारी यांच्या माध्यमातून खर्चाचे नियोजन केले आणि हा अहवाल मागितला परंतु त्यावर अजून कोणताही निर्णय झाला नाही, जे पूर्वी अनुदान निश्चित केले होते तो गेल्या काही वर्षांमध्ये. त्याप्रमाणे अनुदान मिळत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया:
सादर कांदा चाळ अनुदान (Kanda Chal Anudan) योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाच्या महाडीबीटी या अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला जायचे आहे आणि त्या ठिकाणी जाऊन अगदी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करत असताना आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. तुम्हाला जर अर्ज करता येत नसेल तर अशावेळी तुम्ही आपल्या जवळील कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन अर्ज सादर करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.
ज्यावेळी तुम्ही अर्ज सादर करता त्यावेळी शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या अर्जाची पडताळणी केली जाते. पडताळणी झाल्यानंतर सर्व अर्जांपैकी जे कोणी पात्र अर्ज असतील त्यांची वेगळी यादी तयार केली जाते आणि जिल्हा भरती व्यक्ती आहेत त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांक वर मेसेज येतो की, तुम्ही या योजनेस लाभार्थी ठरला आहात. तरी पुढील प्रक्रिया आपल्या संबंधित असलेल्या कृषी विभागासोबत संपर्क साधूनच संपूर्ण करावे. अशा प्रकारचा मेसेज आल्यानंतर आपल्या जवळील तलाठी कार्यालय म्हणजेच तहसील कार्यालयांमध्ये जाऊन कृषी विभाग कुठे आहे. तो बघावा आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची भेट घेऊन पुढील महत्त्वाची जी काही प्रक्रिया असेल ती पार पाडावी. असे केल्यानंतर तुम्हाला कृषी अधिकारी जी काही प्रोसेस असतील ते सांगतील ते प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला योजना अंतर्गत अनुदान मिळेल..