Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकार ने दुष्काळाच्या सदृश परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नवीन उपाययोजना जाहीर केल्या आहेत.राज्य शासनाचा अखेर निर्णय आला, उर्वरित मंडळात शेतकऱ्यांना मिळणार या सवलती जाणून घ्या काय नवीन सावलीती देण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग नेहमीच अनेक आव्हानांना सामोरे जात आहेत, त्यात अलीकडील काळात कमी पाऊसमान आणि दुष्काळांची परिस्थिती हे मोठे आव्हान ठरले आहे. या परिस्थितीत, राज्य सरकारने जून ते सप्टेंबर 2023 दरम्यान सरासरी पावसात 75% कमी झालेल्या आणि एकूण पाउस मान 750 मि.मि. पेक्षा कमी असणाऱ्या तालुक्यांसाठी विशेष उपाययोजना आणि लाभ जाहीर केले आहेत.
दिनांक 10 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयांनुसार नवीन दुष्काळ सदृश्य घोषित केलेल्या 224 महसूल मंडळांसाठी, ज्यांच्या परिसरात अद्याप पर्जन्यमापक यंत्रांची स्थापना होऊ शकली नाही त्या मंडळांना आणि त्याबरोबरच इतर सर्व मंडळांसाठी तक्षाणी लागू होणाऱ्या लाभांची घोषणा केली आहे.
या उपाययोजनांतील मुख्य लाभ खालीलप्रमाणे आहेत:
- जमीन महसूल सूट
- सहकारी कर्जांचे पुनर्गठन
- शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
- कृषी पंपाच्या चालू विज बिलमध्ये 30.5% सूट
- शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
- रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता
- टंचाई जाहीर केलेल्या गावांना शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज खंडित न करणे
(Crop Insurance) आपल्या गावामध्ये या सवलती लागू असल्याचे जाणून घेण्यासाठी, तसेच दुष्काळसदृश गावांची यादी पाहण्यासाठी, कृपया संबंधित शासन निर्णय तपासा. या लाभांमुळे काही परिमाणात शेतकऱ्यांना दुष्काळाच्या समस्यांवर मात करण्यास मदत होईल.