Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पिकविमा योजने अंतर्गत सन 2023 मध्ये खरीप हंगामातील पिकांसाठी पिक विमा योजने अंतर्गत अर्ज नोंदवलेल्या सर्व शेतकऱ्यांना पर्तीकुल परीस्थितीमुळे राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या अधिसूचने नुसार 25 टक्के अग्रिम पीकविमा वाटपाचे काम हे पूर्ण झाले आहे.
केंद्र व राज्य सरकारकडे कृषी विभागाने 52.73 लाख शेतकऱ्यांना 2330 कोटी रुपयांचा पीकविमा भरपाई मंजूर केली असून जानेवारीच्या शेवटपर्यंत 49.58 लक शेतकरी बांधवांना 2243 कोटी रुपये वाटप झाल्याची माहिती हि कृषी विभागा अंतर्गत दिली आहे.
(Crop Insurance) शेतकरी बांधवांना आजूनही पिक विमा हा मिळालेला नाही, कृषी विभागाच्या माहितीनुसार राज्यातील तब्बल 1 लाख 73 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधारकार्ड हे जोडलेले नाही. यामुळे या शेतकरी बांधवांचा पिक विमा हा बँकेकडून वाटप केलेला नाही. कृषी विभागाच्या माहितीनुसार 1 लाख 75 हजार शेतकऱ्यांना 87 कोटी रुपयांचे वाटप हे होणे बाकी आहे.
हे वाचा -कडबा कुट्टी घेण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार एवढे अनुदान,असा करा ऑनलाईन अर्ज Cutter Machine
राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना अजूनही पिक विमा हा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्यावे. त्यानंतर 1.73 लाख शेतकऱ्यांना पिकविमा वाटप होईल.